राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार ?

कृषिकिंग : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात दक्षिण महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तत्कालीन शासनाने तातडीने निर्णय घेत अडीच हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व ज्यांचे पीककर्ज नाही त्यांना तिप्पट भरपाई अशी घोषणा केली. तातडीने पंचनामेही झाले. यानंतर याद्या बॅंकांकडे पाठविण्यात आल्या. याद्या आल्यानंतर शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी पुन्हा तपासणी करून राहिलेल्या शेतकऱ्यांचाही यात समावेश करण्यात आला. या याद्या कृषी विभागाकडून बॅंका, जिल्हाधिकारी कार्यालयांकडे देण्यात येत आहेत. 

येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे; परंतु याद्या पूर्ण झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळून ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत वेगाने राजकीय घडामोडी झाल्या; परंतु सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट आली. याचा परिणाम मिळणाऱ्या कर्जमाफीवर होईल का ? याबाबत पूरग्रस्त शेतकऱ्यांत संभ्रम आहे. 

Read Previous

अन्यथा राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार – बच्चू कडू

Read Next

बटाटा उत्पादनात मोठी घट