वाढीव मदतीसाठी राज्यपालांना भेटणार – अजित पवार

कृषिकिंग : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली हि मदत अतिशय तुटपुंजी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून यावर टीका केली जात आहे.

अवकाळी पावसानं राज्यातला शेतकरी मोडून पडला आहे. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनाही काही अडचणी असतात, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना केलेली मदत अत्यंत तोकडी असून, अजून मदत वाढवून मिळावी यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचं आहे.” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ट्वीट करून दिली आहे.

Read Previous

डाळिंबाच्या आवकेत वाढ: भावात घसरण

Read Next

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला २७ चा मुहूर्त