पीक सल्ला: भाजीपाला पिकात योग्यवेळी तण व्यवस्थापन गरजेचे आहे

कृषिकिंग, अकोला: सर्व भाजीपाला पिकांच्या एकंदरच वाढीसाठी दोन झाडांच्या व ओळींच्या मध्ये तणे वाढून पाणी, सूर्यप्रकाश,हवा आणि अन्नद्रव्य यासाठी स्पर्धा निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. परंतु वेळचेवेळी तणे काढून टाकणे व भाजीपाला पिके तणविरहीत ठेवणे ही बाब शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक प्राथमिकतेने घेणे गरजेचे आहे. त्यासाठी बियांद्वारे लागवड करणा-या भाजीपाला पिकांची उदा. भेंडी, वाल, गवार, चवळी इत्यादी. शेतात लागवड केल्यावर उगवणीपूर्व पेंडामिथीलीन या तणनाशकाची हेक्टरी 1.25 किलो क्रियाशिल घटक 500 लीटर पाण्यात मिसळून जमिनीत ओलावा असतांना फवारणी करावी.

वरील प्रमाणे पाणी, खते व तणव्यवस्थापन करून भाजीपाला पिके जुलै महिन्यात सुदृढ राहतील याबाबत काळजी घ्यावी. 

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला.

Read Previous

कृषीदिंडी- देवावरी भार

Read Next

मुरघास निर्मिती: दुग्धविकासाची गुरूकिल्ली