भाजीपाला सल्ला: अशी करा पालक व मेथी लागवड

पालेभाजीची लागवड : पालेभाज्यामध्ये पालक व मेथीची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. पालक आणि मेथीची लागवड सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत करता येते. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीने टप्पाटप्याने १० ते १५ दिवसाच्या अंतराने बी पेरावे. पालकाचे ऑलग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरीत हे सुधारीत वाण आहेत. तर मेथी मध्ये पुसा अर्ली बंचिंग हे चांगले वाण आहेत. पालक आणि मेथी करीता उत्तम निचरा होणारी, कसदार आणि सुपिक जमिन निवडावी. एक हेक्टर क्षेत्राकरीता पालकाचे ३० ते ४० किलो आणि मेथीचे २५ ते ३० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपुर्वी १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम लावावे. पेरणी सपाट वाफ्यात करावी. पालकाचे दोन ओळीतील अंतर २० ते ३० सेंमी आणि मेथीमध्ये २० सेंमी ठेवावे. पालकाला हेक्टरी ५० किलो नत्र दयावे आणि उरलेले नत्र दोन समान भागात विभागुन पहिल्या आणि दुस-या कापणीच्या वेळी दयावे. मेथी या पिकास हेक्टरी ५० किलो नत्र दयावे व हे नत्र दोन समान हप्त्यात ८ दिवसांच्या अंतराने विभागून दयावे.

-डॉ. एस.एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

Read Previous

बंदिस्त शेळीपालनाचे फायदे

Read Next

साखरेच्या निर्यातीला केंद्र शासनाची परवानगी