समुद्रात जाणारे पाणी वळवणार – फडणवीस

कृषिकिंग : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून हा वाद कायमचा मिटवला जाईल. त्यासाठी केलेल्या योजनेचा आराखडा तयार आहे, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगर -नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा कायमचा संघर्ष संपणार आहे. राज्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

कोपरगाव येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात दुष्काळ आणि अवर्षनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. जलयुक्त शिवार अभियान यातून सिंचनाची मोठी कामे केली. तसेच शेततळी विहिरी देऊन सिंचन आणण्याचा प्रयत्न केला. नीळवंडे धरणाच्याचा कालव्या साठी पैसा दिला. तसेच कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. नगर- नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावर सातत्याने संघर्ष होत असतो. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यातेन समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवण्यात येईल. असे आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read Previous

लागवड आडसाली उसाची – भाग १

Read Next

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार : उद्धव ठाकरे