हळदीचे बाजारभाव स्थिर

कृषिकिंग : जगामध्ये हळद उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर चीन, म्यानमार आणि बांगलादेश इत्यादी देशात हळद उत्पादन केली जाते.

भारतामध्ये २,२५,००० हेक्टर हळद लागवडी खालील क्षेत्र असून हळदीचे उत्पादन १०,७६,००० मे. टन इतके आहे. (२०१८ च्या आकडेवारी नुसार) जगातील एकूण उत्पादनापैकी जवळपास ८३ % उत्पादन भारतामध्ये होते. परंतु एकूण उत्पादनापैकी  फक्त १५ ते २० % हळद निर्यात होते. सरकारने  निर्यातवाढीसाठी योग्य नियोजण केल्यास त्याचा फायदा देशातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना होईल. आपल्या देशात जगातील सर्वाधिक हळद उत्पादान होत असल्याने निर्यातीसाठी भारताला कोणताही मोठा स्पर्धक नाही. परिणामी भारताला निर्यातीमध्ये मक्तेदारी निर्माण करता येऊ शकते. भारतात तेलंगण  राज्यात सर्वात जास्त हळद उत्पादन होते. त्याखालोखाल महाराष्ट्र , गुजरात, तामिळनाडू आणि ओरिसा चा क्रमांक लागतो.  महाराष्ट्रामध्ये हळदीच्या लागवडीखाली सुमारे १२,००० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन १,९०,००० मेट्रिक टन इतके होते. (२०१८ च्या आकडेवारी नुसार )

सन २०१९-२२ या काळात हळदीच्या उत्पादनात सुमारे २१% सीएजीआर इतका अपेक्षित आहे.  हळदीच्या बाजाराच्या वाढीस कारणीभूत ठरणारी महत्त्वाची बाब म्हणजे औषधाच्या घटकांत त्याचा वापर त्यामुळे हळदीचे भाव वाढत आहेत. हळद विविध असाध्य रोगांवर चांगला परिणाम देते.  यामुळे बहुसंख्य आयुर्वेदिक औषधामध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदी मध्ये कुरकुमीन – डायफेरलॉरील मिथेन हा महत्वाचा अँटिकॅन्सर  घटक असल्याचे आढळून आल्यानंतर औषध निर्मिती मध्ये हळदीचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे तसेच घरगुती वापरासोबत सौदर्य प्रसाधने, साबण या मध्ये सुद्धा हळद मोठ्या प्रमाणात वापरली जाते

सध्या हळदीला १३००० ते १६००० प्रति क्विंटल इतका प्रतवारीनुसार भाव भेटत आहे. हा बाजारभाव सामान्य राहतील.

महाराष्ट्रात सांगली जिल्हा हळद उत्पादनात अग्रेसर आहे, देशातील मोठमोठे व्यापारी हळदीच्या खरेदीसाठी सांगली हळद बाजाराला आवर्जून भेट देतात.

Read Previous

कापूस – कीड व्यवस्थापन

Read Next

कपाशी – तुडतुड्यांचे नियंत्रण