सहकार क्षेत्रातील सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण – सहकारमंत्री

कृषिकिंग : सहकार क्षेत्राला लागलेली कीड येत्या काळात प्रशिक्षणाच्या माध्यमातून घालविण्यासाठी आगामी काळात कॉर्पोरेट कंपन्यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देण्यात येईल, असे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत नाशिक येथे आयोजित सहकार पुरस्कार वितरण समारंभात मंगळवारी ते बोलत होते.

यावेळी बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले कि शेतमालावर प्रक्रिया व्हावी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्न करणार आहे. उत्पादन शक्य आहे मात्र विक्रीव्यवस्था निर्माण करण्यासाठी व पुन्हा नवे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुन्हा सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

शेळ्यांचा गोठा कसा असावा ?

Read Next

पावसामुळे गडचिरोली जिल्हात परिस्थिती गंभीर