कांदा भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन कांदा आयात करणार

कृषिकिंग : खरीप कांद्याचे उत्पादन ४०% घटल्याने कांद्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार कांदा आयातीचा विचार करत असून कांदा उत्पादक असलेल्या इजिप्त, टर्की , इराण या देशामधून कांदा आयतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती ग्राहक कल्याण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

देशातील कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र भागात सुरवातीला कमी पावसामुळे कमी क्षेत्र लागवडी खाली आहे त्यातच सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेला अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने कांदा उत्पादनात ४०% घट आलेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये या वर्षी काद्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी झाली असून त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. नाफेड कडून दिल्लीतील कांदा पुरवण्यासाठीचा प्रयत्न सुरु आहे. 

नाशिक जिल्हा कांदा उत्पादक करण्यात अग्रेसर असून नाफेडचे पथक नाशिक जिल्ह्यात येणार असून शेजारील कर्नाटक आणि राज्यस्थान राज्यातील कांदा स्थितीची माहिती घेणार आहे. परंतु शेतकरी वर्ग या बद्दल नाराजी व्यक्त करत असून ज्यावेळी कांदा २ रुपये किलो भावाने विकला जात होता. त्या वेळीस सरकार आणि नाफेडचे पाहणी पथक कांदा स्थिती  पाहणी करण्यासाठी का आले नव्हते ? असा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जात आहे.

निर्यातबंदीची मागणी : आधीच किमान निर्यातमूल्य वाढवल्याने कांद्याची निर्यात होत नसूनही कांद्यावर संपूर्ण निर्यातबंदीची मागणी केली जात आहे. तसेच बाहेरील देशातील कांदा आयात केल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.

देशातील कांद्याचे भाव डिसेंबर महिन्यापर्यंत भाव स्थिर राहतील. कारण केंद्र सरकारने आयात करण्यात आलेला कांद्यामुळे बाजारभावावर जास्त परिणाम होणार नाही.असे जाणकारांचे मत आहे.

Read Previous

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका

Read Next

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा