केंद्र सरकार खाद्यान्न तेल आयात करण्याच्या विचारात, लघु उदयोजकांची चिंता वाढणार

कृषिकिंग : केंद्र सरकार ५ किलोच्या पॅकेजिंग मध्ये तेल आयात करण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्या देशामध्ये तेल बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणात आयात केले जात असून आयात केलेले हे तेल मुख्यत्वे कच्चे तेल असून त्यावर प्रक्रिया करून रिफाईंड केले जाते. यावर आधारित लघु आणि मध्यम उद्योगातील खूप सारे लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. भारतातील एकूण खाद्यतेलापैकी अंदाजे ७० टक्के तेल आयात केले जाते. खालील दिलेल्या आकडेवारी वरून अंदाज बांधला जावू शकेल कि केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयाचा किती प्रभाव पडू शकेल.

भारतामध्ये गेल्या वर्षी (२०१८ मध्ये ) एकूण ७३.७ हजार कोटी रुपयांचे खाद्यान्न तेल आयात केले सरासरी १५० दशलक्ष टन तेल इतर देशातून आयात केले जाते यातील पाम तेलाचा वाटा ५० टक्क्यांपेक्ष्या जास्त आहे (८० ते ९० दशलक्ष टन ) . या ५ किलोच्या पॅकेजिंग वर आयात शुल्क माफ करण्याच्या विचाराधीन मोदी सरकार आहे. या सर्वांचा परिणाम एकूणच पॅकेजिंग इंडस्ट्री वर होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली

Read Previous

परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) सन 2019-20 करिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्यास

Read Next

सोलापूर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव