हि मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : तुपकर

कृषिकिंग : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे.

राज्यपालांनी जाहीर केलेली हि मदत अतिशय तुटपुंजी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून यावर टीका केली जात आहे.

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी 8 हजार रुपयाची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 50 हजार रुपये मदत हवी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. शेतकरी भिकेचा कटोरा घेवून उभा नाही. ही जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची घणाघाती टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे

Read Previous

आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत : अशोक चव्हाण

Read Next

त्यांना शेतकऱ्यांचे दुखः कसे कळणार : राजू शेट्टी