स्वाभिमानी शेतकरी संघटना पाच जागा लढणार

कृषिकिंग : राज्यातील विधानसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना पाच जागांवर निवडणूक लढणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील मिरज, शिरोळ, नंदूरबार, वरुड-बुरशी (जि. अमरावती) आणि खामगाव (जि. बुलढाणा) या पाच जगांवर निवडणूक लढवत आहे. अशी माहिती संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि भाजपचा पराभव करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांची महाआघाडी तयार झाली आहे. महाआघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिरज विधानसभेची जागा सोडली आहे. आघाडीचे उमेदवार म्हणून बाळासाहेब होनमोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा आम्ही ताकदीने लढवू असे सांगितले. शेट्टी म्हणाले, भाजप नेत्यांना पाच वर्षांच्या सत्तेच्या कालावधीतच मस्ती आली आहे. असे देखील यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

Read Previous

शेतकरी आत्महत्या वरून सरकारला घेरणार – खर्गे

Read Next

सात बारा कोरा करण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरेंनी पाच वर्षात काय केल ?