राज्य सरकार प्रत्येक गावात उभारणार शेतकरी भवन

कृषिकिंग : राज्यातील प्रत्येक गावात गावपातळीवर शेतकरी भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे. सरकारतर्फे काही दिवसापूर्वी गाव पातळीवर कृषी सहाय्यक उपलब्ध होत नाहीत. याचा विचार करून कृषी साहाय्यकाकरता ग्रामपंचायत मध्ये बसण्याची व्यवस्था केली होती.

राज्य सरकारच्या कृषी सहाय्यक कक्षाची सुरुवात केल्यानंतर सरकारतर्फे आता गावागावात शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तब्बल २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी भवनासाठी सुमारे १ एकर जागा प्रस्तावित करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Read Previous

लष्करी अळी वाढेपर्यंत सरकार काय करत होते ? – राजू शेट्टी

Read Next

अशी घ्या पिकांची काळजी