राज्य सरकार करणार पाकिस्तान मधून कांदा आयात

कृषिकिंग : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खरीप हंगामात अपेक्षित कांदा उत्पादन झाले नाही. त्यात राज्यातील काही भागात पुराने वेढा घातला परिणामी कांदा महागला आहे. संपूर्ण देशभरात सध्या कांद्याची कमतरता आहे. त्यामुळे कांद्याची किमंत प्रतीकिलो ५० रूपये इतकी झाली आहे. वाढत्या किंमती आवाक्यात आणण्यासाठी सरकारने विदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. एमएमटीसीच्या या निर्णयामुळे नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘एमएमटीसी’ने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातून कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली होती. दोन हजार टन कांदा आयात करण्यासाठी एमएमटीसीने निविदा काढली आहे. एमएमटीसीकडून वर्षातील ही पहिलीच निविदा काढण्यात आली आहे.

दोन हजार टनसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना अमेरिकन डॉलरमध्ये बोली लावावी लागणार आहे. कमीतकमी ५०० टन कांद्यासाठी बोली लावावी लागेल अशी अट आहे. ‘एमएमटीसी’कडून ६ सप्टेंबर रोजी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती. २४ सप्टेंबरपर्यंत दोन हजार टनसाठी आवेदन मागवले आहे. याची वैधता १० ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे.

Read Previous

द्राक्ष सल्ला: पिंकबेरी टाळण्यासाठी द्राक्षघड पेपरने झाका

Read Next

बंदिस्त शेळीपालनाचे फायदे