पावसामुळे गडचिरोली जिल्हात परिस्थिती गंभीर

कृषिकिंग : गडचिरोली जिल्हात मागच्या काही दिवसात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गडचिरोली मधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हातील वैनगंगा, पाल, तठाणी सोबत अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्हातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्याच बरोबर मध्यप्रदेशात देखील सुरु असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, परिणामी गोसीखुर्द प्रकल्पाचे तब्बल ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नद्यावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Read Previous

सहकार क्षेत्रातील सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण – सहकारमंत्री

Read Next

महापुरामुळे कोल्हापुर जिल्हात १२९८ कोटींचे नुकसान