सोयाबीनच्या भावामध्ये १५ ते १६ रुपयांची वाढ

कृषिकिंग : सोयाबीनच्या वायदे बाजारात शुक्रवारी १५ ते १६ रुपयांनी भाव वाढून ४०६५ ते ४०७० रुपये प्रतिक्विंटल झाले. सोयाबीनचा भाव गेल्या महिन्यापेक्षा 0.42 टक्क्यांनी वाढून ४०७० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असल्याने सोयाबीन चे भाव वाढले आहेत. राष्ट्रीय वस्तू व डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंजमध्ये मध्ये सोयाबिन चे 26,540 लॉट विकले गेले.

शुक्रवारी वायदा बाजारात सोया तेलाचे दर 0.08% ने वाढून ७९२ रुपये प्रति १० किलो झाले आहेत. सोयाबीन तेल आणि सोयाबीनच्या दरात सट्टा बाजारामध्ये भाव वाढीचा अंदाज व्यक्त केल्याने सोयाबीन तेलाची मागणी वाढत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे देशभरात सोयाबीन आणि खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे पूरवठयामध्ये कमी येणार आहे. मध्यप्रदेश सोयाबीन उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र, राज्यस्थान आणि गुजरातचा क्रमांक लागतो. या सर्वच प्रदेशात परतीच्या मान्सून मुळे सोयाबीन आणि खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  

मोहरीचे भाव घसरले

बाजारपेठेमध्ये सोयाबीन आणि सोयातेल खरेदी करणाऱ्याकडे ओढा मोहरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शुक्रवारी मोहरीचे वायदे 8 रुपयांनी ( ०.१९% ) घसरून 4,248 रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत

Read Previous

ऐतिहासिक बाबरी मशीद प्रकरणाचा आज निकाल

Read Next

हरभरा पिकाची लागवड २० टक्के वाढण्याची शक्यता