ऐतिहासिक बाबरी मशीद प्रकरणाचा आज निकाल

कृषिकिंग : गेली कित्येक दशके देशभर गाजत असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी १०:३० पासून याप्रकरणी सुनावणीस सुरुवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ ऑक्टोबरला याप्रकरणीचा निकाल राखून ठेवला होता. आज निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, अयोध्या या ठिकाणी विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

Read Previous

पशुप्रजननासाठी खनिजद्रव्ये

Read Next

सोयाबीनच्या भावामध्ये १५ ते १६ रुपयांची वाढ