लष्करी अळीमुळे मका लागवडी रखडल्या

कृषिकिंग : महाष्ट्रासह देशात चालू असलेल्या अमेरिकन लष्करी अळीमुले शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसून येत आहे. या वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानी नंतर शेतकरी वर्ग रब्बी हंगामात मका लागवडी करण्यास धजावत नाही. महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरबरा पिकानंतर मकाच्या लागवडीचे प्रमाण चांगले असते. परंतु या वर्षी अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घातला होता.  त्याचा परिणाम रब्बी पिकावरही लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडीस विलंब होत असून याचा परिणाम मका उत्पादन घटण्यावर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मका पीक हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून यातून चाऱ्याबरोबर धान्य निर्मिती होते. कृषी विभागाने अमेरिकन लष्करी अळी संदर्भात जनजागृतीसाठी आराखडा बांधला आहे. याशिवाय मक्याला चांगला बाजार भेटत असून सुमारे १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल इतका बाजारभाव भेटत आहे. जळगाव जिल्ह्यात किमान ६०,००० ते ७०,००० हेक्टरवर मक्याची लागवड होती. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला असताना रब्बी हंगामावर किडीचे संकट उभे राहिले आहे. रब्बीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असून पाण्याची उपलब्धताही चालू वर्षी खानदेशासह सपूर्ण महाराष्ट्रात वाढली आहे. यामुळे खरीप पिकात झालेले नुकसान रब्बी पिकामध्ये निघेल. अशी आशा बळीराजाला  वाटत आहे. परंतु कीड समस्यांचा सामना कसा करावा या बद्दल शेतकरी चिंताग्रस्त आहे .
सध्या मुंबई मार्केट मध्ये मक्याचे भाव २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल इतके भेटत आहेत.

चालू घडामोडी आणि बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषिकिंग वेबसाईट ला भेट द्या 

Read Previous

पणन महामंडळाच्या कापूस खरेदीची हि असतील केंद्रे

Read Next

गहू उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होणार