कारखान्यांनी कच्ची साखर निर्यात करावी

कृषिकिंग : “कच्च्या साखरेला मिळणारा कारखाना स्तरावर मिळणारा दर कमी असला तरी कच्ची साखरनिर्मिती व निर्यातीतून मोठी आर्थिक बचत अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीलाच कच्च्या साखरेची निर्मिती करावी. निर्यात करारदेखील तातडीने करून घ्यावेत,” अशा सूचना राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केल्या आहेत. निर्यातीसाठी केंद्राने सरसकट १०४५ रुपये प्रतिक्विंटल आर्थिक मदत दिली आहे. यामुळे कारखान्यांना साखर निर्यातीसाठी मिळणारे दर व स्थानिक बाजारातील दर यातील तफावत बऱ्याच प्रमाणात भरून काढणे शक्य होईल.

“कच्च्या साखरेचे आंतरराष्ट्रीय दर बघता कारखाना स्तरावर १८०० रुपये प्रतिक्विंटल व पांढऱ्या साखरेचे दर कारखाना स्तरावर २२०० रुपये क्विंटल असे चढे राहिले आहेत. ऑक्टोबर महिन्यासाठीचा स्थानिक बाजारातील साखर विक्री कोटा २१ लाख टनाचा आहे. त्यामुळे कारखाना स्तरावरील स्थानिक साखर विक्रीचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या स्तरावर गेले आहेत. निर्यातीला मिळणाऱ्या दराची तुलना करता केंद्र शासनाकडून जाहीर झालेल्या १०४५ रुपये प्रतिक्विंटल मदतीमुळे साखर निर्यात करणेच श्रेयस्कर राहील.”अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

Read Previous

…तर कांदा बाजार बंद पाडणार – अनिल घनवट

Read Next

गोठा बांधण्याच्या पद्धती