मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली

कृषिकिंग – राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष व विरोधकात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांची कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

चाकणकर यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधात होते. त्यावेळी शेतकरी आत्महत्या झाल्यावर सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी फडणवीस हे करत होते. मात्र आता तर मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांचे कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला.

Read Previous

राज्य सरकारच्या शेवटच्या बैठकीत तब्बल ३७ निर्णय

Read Next

शेळ्यांचा गोठा कसा असावा ?