सात बारा कोरा करण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरेंनी पाच वर्षात काय केल ?

कृषिकिंग : राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार, अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात असलेल्या सत्तेत काय केले? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, “उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली आहे. परंतु गेल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी काय केले? त्यावेळी का नाही केला केला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला नसलेला बाजारभाव, राज्यातील विकास या प्रश्‍नाकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे.” गेल्या पाच वर्षात या सरकारने कोणातीही विकासाची कामे केलेली नाहीत, असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

Read Previous

स्वाभिमानी शेतकरी संघटना पाच जागा लढणार

Read Next

थंडीत करडांची काळजी