ऊस सल्ला: आडसाली उसाची लागवड पूर्ण करा

कृषिकिंग: आडसाली उसाच्या लागवडीची कामे 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत. लागवडीसाठी दोन सरीमधील अंतर मध्यम जमिनीत 100 सेंमी व भारी जमिनीत 120 सेंमी ठेवावे. पट्टा पद्धतीसाठी मध्यम जमिनीत 75-150 से.मी.व भारी जमिनीत 90-180 सेंमी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. रोगग्रस्त कीडग्रस्त शेतातील व खोडव्याचे बेणे लागणीस वापरू नये ऊस बेणे मळ्यातीलच बेणे लागवडीसाठी वापरावे. ऊस लागणीकरिता उसाच्या एक डोळा अथवा दोन डोळा टिपरीचा वापर करावा. आडसाली लागण करताना को 86032, को.एम 0265 व को.व्ही.एस.आय.1805 या शिफारशीत जातींचा वापर करावा.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव

Read Previous

राज्यात वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना

Read Next

पशुपालकांना पडणारे प्रश्न : गोचीडनाशक रसायनांचा वापर कसा करावा?