राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी “स्मार्ट योजना”

कृषिकिंग : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होतील. त्या निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणाचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी जागतिक बँकेशी करार करण्यास देखील राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

काय आहे स्मार्ट योजना
राज्यातील कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने स्मार्ट योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने २२२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. स्मार्ट योजनेतून कृषी मालासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये शेतीमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतीमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, बाजार समित्यांना नेटवर्कद्वारे जोडणे अशा सुविधांच्या समावेश केला जाणार आहे.

Read Previous

आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खासगी सावकारांच्या कर्जास माफी

Read Next

राज्य सरकारच्या शेवटच्या बैठकीत तब्बल ३७ निर्णय