तर कारखान्यांना व्याजासह शेतकऱ्याना बिल द्यावी लागणार : साखर आयुक्त

कृषिकिंग : चालू वर्षी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असल्याचे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. त्यानुसार कारखान्यांनी नियोजन करण्याची सूचना दिल्या आहेत.

एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी आठवडा भरात माल तारण करून कर्ज घेऊन ऊस बिलाची रक्कम देण्याचे नियोजन करावे. ऊस उत्पादकांना १४ दिवसाच्या आत रक्कम नाही दिल्यास १५ दिवसापासून शेतकऱ्यांना बँक खात्यांतून  १५ टक्के व्याजदराने ऊस बिलाची रक्कम देणे बंधनकारक राहील.

राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखाने ऊस बीलाची रक्कम १५ दिवसाच्या अंतराने करतात. पहिल्या पंधरवड्याची रक्कम २८ ते ३० तारखेपर्यंत अदा करतात आणि दुसऱ्या पंधरवड्यातील रक्कम पुढील महिन्यात केली जाते या पारंपरिक पद्धतीमुळे बहुतांश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची रक्कम २० ते ३० दिवस उशिराने भेटते. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांना शेतातील ऊस कारखान्यात गेला कि देणेकऱ्यांची रांग शेतकऱ्यांच्या घरात लगेच चालू होते. या सर्व बाबीचा विचार करून प्रशासनाने वरील निर्णय घेतला असल्याची प्रथमदर्शनी दिसत आहे. ऊस उत्पादक ऊसबिलची रक्कम १४ दिवसात देण्यासाठी मालतारण कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांकडे कर्ज उचलीची मागणी करावी. असे परिपत्रकात म्हंटले आहे

Read Previous

हळदीच्या फ्युचर्स किंमतीत घट तर सोयाबीन फ्युचर्स किंमतीत वाढ

Read Next

टोमॅटो उत्पादनात २० टक्के घट, तरीही अपेक्षित बाजारभाव नाही