शेतकऱ्यांची बाजू कृषी मंत्रालयासमोर मांडणार – शरद पवार

कृषिकिंग : “केंद्र सरकारसोबत लवकरात लवकर बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्न सरकार सोबत मांडण्याचे प्रयत्न करणार” असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार सध्या दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते  पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान आहे. तसेच ३३ टक्के नुकसान झालेल्यांचे सर्वेक्षण करण्याऐवजी सरसकट पंचनामे किंवा सर्वेक्षण केले पाहिजे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक आहे.त्यामुळे वर्षभराच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना शून्य किंवा कमी व्याज दराने किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज देता येईल का यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याची माहिती पवारांनी दिली. 

केंद्र सरकारसोबत लवकरात लवकर बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी करण्याचे माझे प्रयत्न आहे. तसेच सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक असल्याचे शरद पवार त्यांनी म्हटले आहे.

Read Previous

ऊस दरावरून स्वाभिमानी पुन्हा आक्रमक

Read Next

अन्यथा राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार – बच्चू कडू