कांदा निर्बंधाविरोधात १५ तारखेला सांगली मार्केट बंद

कृषिकिंग : देशभरात कांदा दरातील किमंती वाढल्याने दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्बंध लागू केले. सरकारने कांद्याची निर्यात रोखण्यासाठी १९ जूनला १० टक्के निर्यात अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ८५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात दर करून निर्यातीला प्रतिबंध निर्माण केला. नंतर ३ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्याच्या निर्यातीवर थेट बंदी घातली. तरीही सरकारचे समाधान झाले नाही. देशांतर्गत कांदा व्यापारावर साठामर्यादा घातली. घाऊक व्यापाऱ्यांना फक्त ५० टन तर किरकोळ विक्रेत्यांना ५ टन साठा मर्यादा घातली.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांनी कांदा बाजारात सरकारी हस्तक्षेपाचा निषेध करण्यासाठी १५ ऑक्टोबरला कांदा, बटाटा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात आणू नये, तसेच व्यापाऱ्यांनीही बंद पाळावा, असे आवाहन शेतकरी संघटना (शरद जोशी) आणि सांगली कांदा बटाटा व्यापारी संघटनेच्या वतीने केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये नुकसान झाले. याच्या निषधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Read Previous

कांदा उत्पादकांचा असहकार सुरूच

Read Next

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा अजेंडा – मुख्यमंत्री