रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीत घरवापसी

कृषिकिंग : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेत्यांची पक्षांतर सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तुपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत याच्या रयतक्रांती या पक्षात प्रवेश केला होता.

परंतु तेच रविकांत तुपकर आता एक महिना होत नाही तेच आता परत घर वापसी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. कोल्हापुरात रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत, असे सांगितले जाते.

Read Previous

शेती शाश्वत करणार, भाजपचा जाहीरनाम्यात आश्वासन

Read Next

सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होणार : निर्यातवाढीसाठी सरकारी प्रयत्नांची गरज