तर कृषीमंत्री पद स्वीकारणार – राजू शेट्टी

कृषिकिंग : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळात कोणत्या पक्षाला कोणती खाते मिळणार , याच्या अजूनही चर्चा चालू आहेत. त्यात शपथविधी झालेल्या मंत्र्यांचे अजूनही खाते वाटप झाले नाही. येत्या दोन दिवसात हे नक्की होणार असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये कृषी मंत्रीपदासाठी राजू शेट्टी यांच्या नावावर चर्चा चालू होती. राज्यात बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्यात राजू शेट्टी यांची महत्वाची भूमिका होते. मंत्री पदाच्या चर्चावर बोलताना “समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास नक्कीच कृषीमंत्री पद स्वीकारू” असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

Read Previous

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

Read Next

तर हे सरकार टिकणार नाही – रघुनाथदादा पाटील