दुष्काळी भागाला पुराचे पाणी देणार

कृषिकिंग : यंदाच्या वर्षी जागतिक विक्रम मोडणारा पाऊस राज्यात झाला, त्यामुळे महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्हाची मोठी हानी झाली. त्यामुळे त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जागतिक बँक आणि आशिया विकास बँकेच्या सहाय्याने जादाचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे महापूर आला तरी त्याचा फटका बसणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाजनादेश यात्रा कराड येथे आल्यावर ते पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते, फडणवीस म्हणाले कि राज्य सरकारने पुराच्या पाण्याचे नियोजन करून ते दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन हाती घेतले आहे. महापुरानंतर हानी होवू नये म्हणून जागतिक बँकेने उपाय योजना केली आहे. राज्य सरकार जागतिक बँक आणि आशियन बँकेच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करत आहे.

Read Previous

अशी घ्या पिकांची काळजी

Read Next

शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट भाग-१