दरवाढ नियंत्रणाचा शेतकऱ्यांना फटका – डॉ. मनमोहन सिंग

कृषिकिंग : देशात कॉंगेस सरकार असताना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कॉंग्रेसने कायमच मदत केली आहे. कॉंग्रेसने देशभरात सरसकट कर्जमाफी करून त्यांना दिलासा दिला होता. पण भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे देशाचे भवितव्य अंधारात गेले आहे. या सरकारच्या दरवाढीवर नियंत्रण राखण्याच्या हट्टाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर दुसरीकडे आयात निर्यात धोरणालाही झळ बसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हि दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदे मध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले कि मागच्या पाच वर्षात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. आर्थिक मंदीवर उपाय शोधण्यात सरकार अपयशी ठरले आहे. असे देखील यावेळी मनमोहन सिंग म्हणाले.

Read Previous

दुधाचे थकीत अनुदान वाटपाची शक्यता

Read Next

मध्य प्रदेशात कापसाला ५४०० रुपये दर