टिकवा जमिनीची सुपीकता

कृषिकिंग : पीक पोषणासाठी आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे पिकांचे संतुलित पोषण योग्य पद्धतीने हवे. दुसरी गोष्ट म्हणजे या आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते. अन्नद्रव्यांच्या उपलब्ध विविध घटकांचा कुशलतेने वापर करावा. या पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पिकांना आवश्‍यक सर्वच म्हणजे मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा तर होतोच; परंतु त्यासोबतच जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते.

अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी निरनिराळे स्रोत वापरण्याची गरज आहे. प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीची खते, निंबोळी पेंड, मासळी खत, कोंबडी खत इत्यादी तसेच रासायनिक खते आणि पिकांचे अवशेष उदा. मूग, हरभरा, सोयाबीन यांचे कुटार, गव्हांडा इत्यादी सर्व अन्नद्रव्यांचे स्रोत यांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. फक्त रासायनिक खतेच वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच निव्वळ सेंद्रिय खतांमधून आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी या दोन्ही संसाधनांचा एकमेकास पूरक असा एकात्मिक वापर फायद्याचा आढळून आला आहे. दीर्घ मुदतीय खत प्रयोगावरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

स्त्रोत – विकासपिडीया

Read Previous

कॉंग्रेस-भाजपची यादी जाहीर, शिवसेनेकडून थेट एबी फॉर्मचे वाटप

Read Next

टिकवा जमिनीची सुपीकता – एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर