दुधाचे थकीत अनुदान वाटपाची शक्यता

कृषिकिंग : दूध पावडर प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, दुधासाठी इतर योजनेतून प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदानाचा लाभ घेतल्याने पावडर अनुदान वाटपाचा निर्णय रद्द केला गेला. त्यामुळे किमान इतर योजनेतील थकीत अनुदान तरी द्या, अशी मागणी केली जात आहे.

राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले कोट्यवधीचे अनुदान देण्याच्या जोरदार हालचाली शासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. यामुळे संकटातील दूध प्रकल्पांना ऐन दिवाळीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नियमांमुळे डेअरी उद्योग आधीच हैराण झालेला आहे. त्यात पुन्हा थकीत अनुदानाचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो. त्यामुळे दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार व दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त नरेंद्र पोयाम यांच्याकडून थकीत अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read Previous

उसाला प्रतिक्विंटल ३० रुपये अनुदान द्या, उत्तर प्रदेशात साखर कारखान्याची मागणी

Read Next

दरवाढ नियंत्रणाचा शेतकऱ्यांना फटका – डॉ. मनमोहन सिंग