पीक सल्ला: ऊस बेण्यांची प्रक्रिया करून लागवड फायदेशीर ठरते

कृषिकिंग,पाडेगाव: ऊस बेणे लागण करण्यापूर्वी खवले कीड,पिठ्या ढेकूण,लोकरी मावा,पांढरी माशी या किडीच्या नियंत्रणासाठी 300 मिली मेलॅथिऑन 50 टक्के प्रवाही अथवा डायमेथोएट 265 मिली 30 टक्के प्रवाही आणि 100 ग्रॅम बावीस्टीन (0.1 टक्के) 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये 10 मिनिटे बुडवावे आणि तेच बेणे परत 100 लिटर पाण्यात 10 किलो प्रति हेक्टरी अॅसेटोबॅक्टर डायअॅझोट्रॉपिकस आणि 1.25 किलो आणि 1.25 किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रति हेक्टरी याप्रमाणे मिसळून तयार केलेल्या द्रावणात 30 मिनिटे बुडवून ठेवावे व नंतर लागणीसाठी वापरावे. त्यामुळे नत्राच्या मात्रेत 50 टक्के व स्फुरदाच्या मात्रेत 25 टक्के इतकी बचत होते.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ.मृणाल अजोतीकर
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव.

Read Previous

कृषीदिंडी- स्मरणाचे वेळें

Read Next

चारा पिके घेण्याची हायड्रोपोनिक्स पद्धत