अन्यथा राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार – बच्चू कडू

कृषिकिंग : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा. ५ दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असल्याचं प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजे शेतकऱ्यांना काय मदतच करायची नाही काय?? असा सवाल उपस्थित करत गरज पडल्यास राजभवनच काय पण मी राष्ट्रपती भवनावर देखील मोर्चा काढायला तयार आहे, असं देखील बच्चू कडू म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपये देण्याची त्यांनी मागणी केली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी आज राजभवनावर आंदोलन पुकारलं होतं. मात्र राजभवनावर जाण्यापूर्वीच त्यांचं हे आंदोलन पोलिसांनी रोखलं. मात्र शेतकरी प्रश्नांसाठी माझी वाटेल ती करण्याची तयारी असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

Read Previous

शेतकऱ्यांची बाजू कृषी मंत्रालयासमोर मांडणार – शरद पवार

Read Next

राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार ?