राज्यात केवळ 43 टक्के पेरण्या पूर्ण

कृषिकिंग: राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. मराठवाड्यात पेरण्यांचे प्रमाण केवळ 30 टक्के आहे. राज्यात एकूण 43 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. , अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. एरवी या कालावधीत राज्यात 75 टक्के पेरण्या झालेल्या असतात. पण यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मराठवाडय़ाच्या बहुतांश भागासह राज्यातील १६० तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर १९४ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.
राज्यातील ३२६७ धरणांमध्ये १७.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात २८.७७ टक्के पाणीसाठा होता. कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक ४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मराठवाडय़ातील धरणांमध्ये सर्वात कमी ०.८ टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांत २६.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Read Previous

ह्युंदाई कंपनीची संपूर्ण इलेक्ट्रिक कार बाजारात

Read Next

मिरची सल्ला: खरीप लागवड