कांदा बाजारभाव विश्लेषण

कृषिकिंग : कमी उत्पादनामुळे कांदा निर्यातीवर भारताने बंदी घातल्यामुळे, बांगलादेशसारख्या देशांनी म्यानमार, इजिप्त, तुर्की आणि चीनसारख्या देशांकडे कांद्याच्या आयातीसाठी मागणी केली आहे तसेच भारतातील कमी उत्पादन आणि देश्यातर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली. आशियामध्ये सर्व देशात कमी उत्पनामुळे कांद्याची प्रचंड भाववाढ चालू असून सामान्य गृहिणींच्या डोळ्याला पाणी येत आहे. उशिरा झालेल्या पावसामुळे आणि त्यांनतर काही भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने निर्यातीवर बंदी घातली आहे.

“केवळ गेल्या महिन्यात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत.” पाकिस्तानी चिकन करी असो, बांगलादेशी बिर्याणी किंवा भारतात सांबार असो, आशियाई ग्राहका च्या प्रत्येक डिशसाठी भारतीय कांद्याच्या वापरला जातो. चीन किंवा इजिप्तसारख्या प्रतिस्पर्धी निर्यातकर्त्यांपेक्षा कमी मालवाहतुकीची वेळ, आणि उत्तम गुणवत्ता यामूळे बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया आणि शेजारील देश्यामध्ये खूप मागणी असते. परंतु गेल्या रविवारी स्थानिक किंमती ५० रु. रुपयांवर गेल्यानंतर सरकारने भारतातून सर्व निर्यातीवर बंदी घातली. उन्हाळ्यात पेरणी झालेल्या पिकाची आवक सर्वसाधारणपेक्षा कमी असल्यामुळे दर ४५०० प्रति १०० किलो इतके उच्चांकी झाले आहेत. गेल्या सहा वर्षातील हा रेट सर्वात जास्त असून शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे

31 मार्च रोजी संपलेल्या 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने 2.2 दशलक्ष टन ताज्या कांद्याची निर्यात केली, अशी माहिती भारतीय कृषी व प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने दिली आहे.आशियाई देशांतील अर्ध्याहून अधिक आयात ही भारतातून  च केली जाते त्या मुले बांगलादेश ,श्रीलंका इंडोनेशिया सारखे देश कांद्याच्या पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे.

बांगलादेशच्या राजधानीत ग्राहकांना १ किलो कांद्यासाठी १२० रुपये इतके पैसे द्यावे लागत असून याचा भारतातील शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. उन्हाळी कांदा बाजारपेठे मद्ये येईपर्यंत बाजारभाव जास्तच राहणार आहेत. इजिप्त किंवा इतर देशामधून होणारी आयात जास्त परिणाम करेल, असे दिसत नाही. कारण देशांना पुरेल इतका कांदा कोणताही देश पुरवू शकत नाही.

कांदा उत्पादनात अग्रेसर राज्ये : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार

भारतातील कांदा प्रामुख्याने पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देश तसेच युरोपियन देशांत होतो. निर्यात वाढवली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा मोठ्या प्रमाणात होतो.

आकडे वारी
देशामध्ये दररोज लागणारा कांदा – ५०,००० टन
वार्षिक गरज -१७० लक्ष टन
ऑक्टोबर महिन्यातील बाजारभाव :
( १ ऑक्टोबर १९  ते ९ ऑक्टोबर१९)  : २००-४५००/ क्विंटल  (ठोक बाजारभाव)
देशातील उत्पन्न  गेल्या पाच वर्ष्यातील

लागवडी खालील क्षेत्र उत्पन्न
२०१८-१९ : २३,६१,००० ***
२०१७ -१८ : २३,२६,२०० ४६ लक्ष टन
२०१६-१७ : २२,४२,७०० ३५ लक्ष टन
२०१५ -१६ : २०,९३,१०० १८ लक्ष टन
२०१४ -१५ : १८,९२,७०० १७ लक्ष टन

भारताची निर्यात
२०१८-१९ –  २१ लक्ष मेट्रिक टन
२०१७ -१८-  १५ लक्ष मेट्रिक टन
२०१६-१७ –  २४ लक्ष मेट्रिक टन
२०१५ -१६ – १३ लक्ष मेट्रिक टन
२०१४ -१५ – १२ लक्ष मेट्रिक टन

भारताची आयात
२०१८-१९ –  ***
२०१७ -१८-  ६५९८ लक्ष मेट्रिक टन
२०१६-१७ – ८६ मेट्रिक टन

*** चालू वर्षी ची माहिती अद्यावत केलीली नाही
संदर्भ- अपेडा (कृषी व प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (आपेडा)

Read Previous

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा अजेंडा – मुख्यमंत्री

Read Next

लागवड आडसाली उसाची – भाग १