कांदा बाजारातील आवक मंदावलेलीच

कृषिकिंग : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंध लादल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजारातील कांदापुरवठा रोखून धरला. त्यामुळे अनेक बाजार समित्यांत सलग तिसऱ्या दिवशीही आवक प्रचंड रोडावली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला होता, तसेच जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही, कांदा बाजारात आणू नका, असे आवाहनही शेतकऱ्यांस केले होते.

शेतकरी संघटनाच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महत्त्वाच्या बाजार समित्यांत जवळपास ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कांदा आवक रोडावल्याचे चित्र अनेक बाजार समित्यात दिसले. नाशिक जिल्हात जिल्हाभर कांदा उत्पादकांचा ‘असहकार’ सुरूच असल्याचे समोर आले आहे. शेतकरी संघटनांनी प्रत्यक्ष कामकाजात हस्तक्षेप न करता कांदा बाजारात आणू नये, यासाठी भेटीगाठी घेत बंदची हाक दिली. तसेच व्यापाऱ्यांनाही लिलाव बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र बाजार समित्यांनी कामकाज सुरू ठेवण्याची घेतलेली भूमिका घेतल्याने कारवाईच्या धाकाने व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू आहेत.

Read Previous

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

Read Next

आघाडीचा जाहीरनामा फसवा – मुख्यमंत्री