आवक कमी झाल्याने कांदा महागला

कृषिकिंग : राज्यात महिन्याभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाचा फटका बसल्याने राज्यात सर्वत्र कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वर्षीच्या एकूण उत्पादनापैकी केवळ २५ टक्के कांदा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारात मागील तीन महिन्यांपासून कांद्याची आवक मंदावली आहे.

बाजारातील आवक मंदावल्याने मागणी पूर्ण होत नसल्याने दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात १२ ते १५ रुपये किलो असलेला कांदा सध्या २२ ते २८ रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

Read Previous

मध्य प्रदेशात पण पावसाचा हाहाकार

Read Next

कोंबड्यांचे लसीकरण : ०४