कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धतीकृषिकिंग,पुणे : कांदा पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागण करावी. रोपांची चांगली वाढ व्हावी याकरिता पुनर्लागणीच्या वेळी आणि पुनर्लागणीनंतर तीन दिवसांनी पाणी देण्याची गरज असते.सतत पाऊस पडत असल्यास काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता अतिरिक्त पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणे आवश्यक आहे.


-डॉ.शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचानलाय, राजगुरूनगर, पुणे.

Read Previous

निविदा प्रक्रिया रखडल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर

Read Next

अशी करा जातिवंत गोपैदास