एकरी २५ हजार मदतीसाठी किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

कृषिकिंग : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना गुंठ्याला 80 रुपये जाहिर केलेली तोकडी मदत राज्यपाल व पंतप्रधानांना प्रत्येक शेतकरी परत पाठविणार आहे. प्रति एकर 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या. पिकविमा न मिळण्याच्या विरोधात 25 नोव्हेंबरपासून किसान सभा राज्य़भर आंदोलन करणार असल्याचा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.

Read Previous

गहू उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होणार

Read Next

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर