
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळणार अडीच हजार जणांना डाळमिल
कृषिकिंग : शेतकऱ्यांना शेतीसोबत अन्य पूरक व्यवसाय करता यावेत, यासाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ दिला जातो. या योजनेतून मिनी डाळमिल आणि पूरक संचाचाही लाभ दिला जात आहे. त्यावर सुमारे सव्वापाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सर्वाधिक मिनी डाळमिल अमरावती जिल्ह्याला मिळणार आहेत. ठाणे विभागात मात्र मिनी डाळमिल दिली जाणार नाही
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यभरातील २५०० लाभार्थ्यांना मिनी डाळमिल व २५० लाभार्थ्यांना डाळमिलपूरक संचाचा लाभ मिळणार आहे. सर्वाधिक मिनी डाळमिल अमरावती जिल्ह्याला मिळणार आहेत. ठाणे विभागात मात्र मिनी डाळमिल दिली जाणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये या वर्षी २५० मिनी डाळमिल व २५० डाळमिलपूरक संचाचा लाभ दिला जाणार आहे. मिनी डाळमिलसाठी दीड लाखाचे तर पूरक संचासाठी ७५ हजारांचे प्रत्येकी अनुदान दिले जाणार आहे.