मान्सूनने घेतला देशाचा निरोप

कृषिकिंग : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर बुधवारी १६ ऑक्टोबरला महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. तर राजस्थानातून सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरातच परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. दक्षिण भारतातील राज्यामध्ये ईशान्य मॉन्सून सक्रिय झाला असून, १५ डिसेंबरपर्यंत या राज्यांमध्ये ईशान्य मॉन्सून मुक्काम करेल.

Read Previous

भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या – शरद पवार

Read Next

गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग १