पशूंना खनिज मिश्रण देण्याच्या पद्धती आणि फायदे

  • खनिज मिश्रण अाबोणातून जनावरांना खाऊ दिले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या खुराकात निरनिराळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते, परंतु खनिजांचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे योग्य ठरते.
  • क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण ठराविक भागातील जमिनीमधील आणि पिकांमधील खनिजांच्या प्रमाणाचा अभ्यास करून बनविली जातात. जी खनिजे जमिनी आणि पिकांमध्ये कमी असतील, अशा खनिजांचाच क्षेत्रनिहाय खनिज मिश्रणात अवलंब केला जातो.

खनिज मिश्रणाचे फायदे

१) वासरांची आणि कालवडींची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात.
२) वळू आणि गाईंची प्रजोत्पदानाची कार्यक्षमता वाढते. वेताचा काळ वाढून (दूध उत्पादनाचा काळ) दोन वेतांतील अंतर कमी होते.
३) खाद्याची उपयुक्तचा वाढते.
४) दुग्धोत्पादनात वृद्धी होते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Read Previous

कृषिकिंग ॲप : नवीन अपडेट

Read Next

पुणे विद्यापीठ उभारणार लडाखला शेती संशोधन केंद्र