बाजारभाव विश्लेषण : बटाटा

कृषिकिंग :१६-१७ व्या शतकाच्या उत्तरार्ध पोर्तुगाल मधून भारतात बटाटा आला. पण आज बटाटा उत्पादक देश म्हणून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात सन २०१८ मध्ये २२,५५८ दशलक्ष टन एवढे बटाटा उत्पादन झाले होते.

२०१८ -१९ वर्षातील उत्पादन अंदाज

१९६० ते २००० च्या दरम्यान बटाट्याच्या उत्पादनात जवळपास ८५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, मध्यम वर्गीय वस्ती असलेल्या शहरी लोकसंख्येच्या वाढत्या मागणीला प्रतिसादमुळे १९९० पासून बटाटाच्याच आहारातील वापर दरडोई वर्षाकाठी सुमारे १ किलोवरून १२ किलोपर्यंत वाढला आहे. भारतात उत्तर प्रदेश,बिहार, गुजरात, हरियाणा ,पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड , छत्तीसगड, या राज्यामध्ये बटाटा हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. या मध्ये उत्तरप्रदेश हे राज्य बटाटा उत्पादन करण्यात अग्रेसर आहे.

बाजार पेठेतील आवक

ऑक्टोबर ते मार्च या काळात थंडीच्या थंडीच्या दिवसात गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात बटाटा हे पीक घेतले जाते. तर काही ठिकाणी वर्षभर तर दक्षिणेकडील तुलनेने जास्त उंची असलेल्या थंड प्रदेशात बटाट्याचे उत्पादन घेतले जाते.

किरकोळ बाजारभाव: महाराष्ट्रातील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान ८०० ते १६०० रु प्रति क्विंटल इतके भाव होते, गेल्या ४ वर्षातील बाजारभावाचा अभ्यास केला तर असे दिसून येते कि जुलै , ऑगस्ट, सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्या दरम्यान बटाटा पिकास चांगला बाजार भेटत आहे. शेतकऱ्यांनी शीतगृहाच प्लॉनिग करून चांगले उत्पन्न मिळवता येईल.

महाराष्ट्रातील बटाटयाच्या प्रमुख वाण : चंद्रमुखी, कुफरी जहर, कुफ्री अशोका, कुफरी ज्योती, कुफ्री दर, कुफ्री सिंधुरी.

वर्तमान स्थिती :

  • खरीप पिकविणारी प्रमुख राज्ये म्हणजे कर्नाटक, उत्तरखंड, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश.
  • खरीप अंतर्गत पेरले गेलेले सरासरी पाच वर्षे सुमारे ७१ हजार हेक्टर वर लागवड झाली
  • तर मागील वर्षीच्या ३८ हजार  हेक्टर तुलनेत सुमारे २९ हजार हेक्टर इतक्या एरिया मध्ये खरिपाची लागवड झाली आहे
  • सद्द्या  बाजारपेठे मध्ये उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये खरीप बटाटा येत आहे. यामध्ये  95% पेक्षा जास्त बटाटा कोल्ड स्टोअरेजमधून येत आहे
  • कोल्ड स्टोअरेजमधून येणारा बटाटा उत्तम प्रतीचा येत आहे

निर्यात : भारतातून बटाटा निर्यात प्रामुयाने सौदी अरेबिया, ओमान, इतर आखाती देशयामंध्ये होते , तसेच श्रीलंका आणि सिंगापूर , मलेशिया या देश्यामद्ये बटाटा निर्यात होतो. आपल्या देशाची गरज भागवून खूप मोठ्या प्रमाणात बटाटा राहतो. त्याची निर्यात जास्त प्रमाणात झाली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो . बटाटाच्या वापर प्रामुख्याने पॅकेजड फूड्स मध्ये मोट्या प्रमाणात केला जातो.

चालू वर्षातील भारताची निर्यात
Read Previous

फडणवीसांच्या काळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज – राज ठाकरे

Read Next

लागवड आडसाली उसाची – भाग २