कडकनाथ फसवणूक प्रकरणी सांगलीत १६ ला मोर्चा

कृषिकिंग : कडकनाथ कोंबडी प्रकरणात अनेक शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याच्या विरोधात राज्यभर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना सांगली येथे रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच 16 सप्टेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनाचे आमिष दाखवून अनेक शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. 16 सप्टेंबररोजी सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Read Previous

राज्यातील 2 कोटीहून अधिक शिधापत्रिकांचे संगणकीकरण

Read Next

मध्य प्रदेशात पण पावसाचा हाहाकार