फडणवीसांच्या काळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज – राज ठाकरे

कृषिकिंग : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं, शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे, असं भाजपाने २०१४च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं.पण सरकार आल्यानंतर भाजपने असं काय वेगळ केलं ? देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राच्या डोक्यावरचं अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय. अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ते भांडुपच्या सभेत बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले कि प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील 5 वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात आणि लोकं पण प्रश्न विचारत नाहीत. असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.

Read Previous

सरकार येताच २४ तासात कर्जमाफी, हरियाना कॉंग्रेसचा जाहीरनामा

Read Next

बाजारभाव विश्लेषण : बटाटा