कृषीदिंडी- स्मरणाचे वेळें

आजचा मुक्काम – वेळापूर


स्मरणाचे वेळें । व्हावें सावधान कळें | 1 ||
पडीलो विषयांचे ओढी । कोणी न दिसेसे काढी ॥ 2॥
भांडवल माझें । वेच झालेंभूमी ओझे || 3 ||
तुका म्हणें कळें । तू चि धावे ऐसें कळें ॥4 ॥

निरुपण :-
भगवंताचे स्मरण करताना माझी वृत्ती सावध ठेवावी हे मला कळत नाही. ॥ १॥
मी विषयांच्या तावडीत सापडलेलो आहे, व मला यातून कोणी सोडवेल असे वाटत नाही ॥ २॥
माझे जे भांडवल होते ते सर्व खर्च झाले आहे आणी ह्या देहाचे भूमीला ओझें झाले आहे ॥ ३॥
तुका म्हणतो की हे देवा आता तूंच धावून यावे असे मला वाटते ॥ ४॥
|| रामकृष्ण हरी ||

Read Previous

The Number One Article on Your Best Vpn Service

Read Next

पीक सल्ला: ऊस बेण्यांची प्रक्रिया करून लागवड फायदेशीर ठरते